शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरच्या सहायक अभियंत्यासह ४ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

औरंगाबाद : वीजबिलाच्या तक्रारीची दखल न घेणे, वीजबिल दुरुस्त न करणे, अनधिकृतपणे आकडे टाकून विजेचा वापर चालू ...

औरंगाबाद : वीजबिलाच्या तक्रारीची दखल न घेणे, वीजबिल दुरुस्त न करणे, अनधिकृतपणे आकडे टाकून विजेचा वापर चालू असणे, गैरवर्तन, कामात अनियमितता व निष्काळजीपण इत्यादी गंभीर प्रकार महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या तपासणीत आढळून आल्याने, महावितरण जिंतूर ग्रामीण शाखा (जि. परभणी) येथील एक सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व विद्युत सहायक यांना निलंबित केले आहे, तसेच परभणी येथील अधिक्षक अभियंता यांनी कर्मचाऱ्यांवर अधिक नियंत्रण ठेवण्याच्या सूचना प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथील पाच पथकांनी १० मार्चला परभणी जिल्ह्यात थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची फेरतपासणी केली. जिंतूर येथील शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चारठाणा भागात सॉमिल व पिठाच्या गिरणी येथे अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता. या प्रकरणी सहायक अभियंता विनायक उत्तमराव दिग्रसकर यांना अधिक्षक अभियंता यांनी निलंबित केले आहे. अशा प्रकारे अनधिकृत वीज वापरावर प्रतिबंध करण्यासाठी संबंधित ग्राहकावर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चारठाणा, पाचलेगाव येथे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात आकडे आढळून आल्याने कामात अनियमितता व गैरवर्तन, वीजबिल वसुलीत दुर्लक्ष करून कंपनीच्या महसुलाचे नुकसान करणे इत्यादी दोषारोप प्रकरणी प्रधान तंत्रज्ञ आत्माराम दत्तराव ननवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ अब्दुल रहेमान अब्दुल हमीद, विद्युत सहायक खुशाल ज्ञानदेव कऱ्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. या तपासणी कामात अनियमितता आढळून आल्याने सहायक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर व बामणी येथे प्रशाससकीय कामात अनियमितेचा ठपका ठेवून गंगाखेड ग्रामीण शाखा तंत्रज्ञ साहेबराव विनायक पवार व विनोद भारत गुरव, जिंतूर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ बजरंग सखाराम साबळे, सुरेश पांडुरंग तारू, सुरेश साहेबराव खंदारे, तंत्रज्ञ नरेश लालपट बनपुरे यांची परभणी मंडळाबाहेर बदली करण्यात आली आहे.