जालना : जालना नगर पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे १६ तर नगरसेवक पदासाठीचे १२० अर्ज मागे घेण्यात आले. शुक्रवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने सकाळपासूनच नगर पालिका कार्यालयांत मोठी गर्दी होती. दुपारी तीन वाजेपर्यंत ३० प्रभागातील अनेक नगरसेवकांनी आपले मागे घेतले. नगर पालिकेसाठी नगरसेवक पदासाठी ६९५ तर नगराध्यक्षपदासाठी ३९ जणांना नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. दोन्ही मिळून १३६ जणांनी अर्ज मागे घेण्यात आले. गुरूवारी विविध आक्षेप तसेच सुनावणीनंतर ३३ नगराध्यक्षांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी ६ जणांचे अर्ज अवैध ठरले तर २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर नगरसेवकपदासाठी एकूण ६८२ अर्ज प्राप्त झाले होते. पैकी १८४ अर्ज अवैध तर ४९८ अर्ज वैध ठरले.
जालन्यात ३८९ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 00:48 IST