हिंगोली : राज्यातील नगरपालिकांना २००९-१० ते २०१३-१४ या कालावधीसाठी प्रतिवर्षी १० टक्के वाढीप्रमाणे सहाय्यक अनुदानाची फरक रक्कम वितरीत करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. त्यानुसार ३८ पालिकांना ५० कोटी ६३ लाखांचे अनुदान वितरीत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली आहे.संघटनेच्या वतीने १५ जुलै रोजी करण्यात आलेल्या संपात ३८ न.प.च्या सहाय्यक अनुदानाची थकबाकी देण्याची मागणी शासनाकडे देण्यात आली होती. शासनाकडून देण्यात येत असलेले जकात अनुदान व महागाई भत्ता अनुदान बंद करून सर्व पालिकांना सहाय्यक अनुदान ३१ आॅगस्ट २००९ च्या निर्णयानुसार मंजूर करण्यात आले होते. तथापि काही पालिकांना मंजुर केलेले अनुदान कमी पडत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे २००९-१० साठी सुधारीत अनुदान निश्चित करण्यात आले. ३८ पालिकांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. (प्रतिनिधी)
३८ नगरपालिकांना अनुदान
By admin | Updated: August 21, 2014 23:20 IST