शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

३७७३ रुग्णांना लाभ

By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ३०८ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर आतापर्यंत ३ हजार ७७३ उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या उपचारावर शासनाने आतापर्यंत १० कोटी ७४ लाख ४ हजार १५ रुपये खर्च केले आहेत.कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गतवर्षीपासून महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर आजारांसाठीही स्वतंत्र पॅकेज देण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयासोबत औरंगाबादेतील २२ खाजगी रुग्णालयातही उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णास केवळ रेशनकार्ड अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागते. या कागदपत्राच्या आधारे सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यात येतात. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात सर्वाधिक ३९६ कुटुंबांतील ५०५ जणांवर शस्त्रक्रिया उपचार करण्यात आलेल्या त्यासाठी जीवनदायी योजना राबविणाऱ्या संस्थेकडून त्यांना २ कोटी ४० लाख ६२ हजार ७५० रुपये प्राप्त झाले आहेत. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४८५ कुटुंबांतील ८७४ रुग्णांवर उपचार झाले. त्यासाठी या रुग्णालयास २ कोटी ५७ लाख ८ हजार ८०० रुपये मिळाले. घाटी रुग्णालयात यावर्षी आतापर्यंत ८४२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर शासकीय कॅन्सर रुग्णालयात १४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या खर्चापोटी रुग्णालयांना अनुक्रमे ११ लाख ८ हजार रुपये आणि १ कोटी ३८ लाख ६ हजार ३८५ रुपये प्राप्त झाले आहेत. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्येही सुमारे ४४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी त्यांना १ कोटी ५९ लाख ४४ हजार २४० रुपये उपचाराचा खर्च म्हणून प्राप्त झाला आहे.