लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सन २०१६- १७ मध्ये प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेत ३५०८ तर रमाई आवास योजनेत १०२१ एवढ्या लाभार्थ्यांची निवड झाली होती. तर प्रधांनमत्री आवासमधील ३७ लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तर प्रधानमंत्री आणि रमाई आवास योजनेतील ३ हजार ४१३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केले आहे. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील ६६६ पैकी ४११ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप केला आहे. वसमत ६२३ पैकी ४१२, हिंगोली ६०१ पैकी ४८४, कळमनुरी ८८९ पैकी ७२२ आणि सेनगाव ७२९ पैकी ६०४ असे एकूण २ हजार ६३३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप केला आहे. तसेच रमाई आवास योजनेतही १०२१ मंजूर लाभार्थ्यांपैकी ७८० आणि शबरी घरकुल योजनेत २२७ पैकी १६२ तर पारधी घरकुल योजनेत १३ लाभार्थ्यांपैकी १० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला असल्याची नोंद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे. मात्र त्यानंतर दुसरा हप्ताच न मिळाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर असल्याचे पुढे येत आहे. लाभार्थी जेव्हा यासंदर्भात पं.स. कडे विचारणार करण्यासाठी खेटे घेत असता त्यांना ‘आॅफलाईन’ आणि ‘आॅनलाईन’चा गुंता सांगत वाटे लावत आहेत. त्यामुळे बरेच लाभार्थी घरची परिस्थती सांगून दुसरा हप्ता देण्याची मागणी करीत आहेत. लाभार्थ्यांच्या संचिका ताब्यात असलेला कर्मचारीच गायब असल्याचे माहित आहे. मात्र तरीही त्या कर्मचाऱ्याकडून संचिका आणण्याचे लाभार्थ्यांना सांगून छळले जात आहे. सीईओ एच.पी. तुम्मोड यांनी दोन दिवस बैठका घेतल्यानंतरही हिंगोली पं.स.त हे हाल आहेत. लाभार्थ्यांच्या घरात मात्र पावसाचे पाणी घुसत असल्याचे टाकळीतर्फे नांदापूर येथील लक्ष्मण पाईकराव यांनी सांगितले.
३७ लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण
By admin | Updated: June 23, 2017 23:23 IST