शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गटामध्ये ३६ तर गणात ६८ उमेदवार

By admin | Updated: February 8, 2017 00:19 IST

कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़

कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़ तर चोराखळी गणातील उमेदवारांच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत १० फेब्रुवारी रोजी अंतीम निर्णय होणार आहे़ नायगाव गटातून राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली तर ईटकूर गटात सेनेत बंडखोरी झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांसाठी आता बहुतांश ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत़ उमेदवारी मागे घेण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांना पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी या नेत्यांना यश आले तर काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्या ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अडचण येणार आहे. ईटकूर गटात सेनेच्या दोन वेळेसच्या जिल्हा परिषद सदस्या पंचफुला मधुकर सावंत यांना सेनेने उमेदवारी नाकारली. मधुकर सावंत हे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी रिपाइं (आठवले गट) मधून सेनेत नुकताच प्रवेश केलेले कालिदास सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. पंचफुला सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. डिकसळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार पद्मजा निळकंठ शिंदे यांनीही उमेदवारी मागे घेतली. या गटात आता सेना, राष्ट्रवादी व भाजपा पुरस्कृत उमेदवारांत लढत रंगणार आहे. शिंदे यांची उमेदवारी मागे घेण्यामागे काँग्रेसच्याच एका गटाचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याव्यतिरिक्त ईटकूर गणातील प्रांजली आडसूळ, मंगरूळ गणातील विद्या जाधव, हासेगाव (केज) गणातील हरिश्चंद्र कुंभार या काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसला आता ईटकूर व डिकसळ गटात तसेच मस्सा (खं), ईटकूर, मंगरूळ, हासेगाव (केज), लोहटा (पूर्व) या पाच गणात उमेदवारच नाहीत.