शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:27 IST

जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले

जालना : जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले. यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक कृषिसेवा केंद्रांवर कीटकनाशक विक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते व शेतक-यांच्या कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या अभियानामध्ये कृषिसेवा केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीच्या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषिविकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्ह्यातील कृषि केंद्रांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये सुमारे १२०० कृषी केंद्रांतील कीटकनाशके, खरेदी-विक्रीच्या नोंदवह्या, दर फलक, अतिजहाल कीटकनाशके यांची तपासणी करण्यात आली. पैकी पाचशे दुकाने वर्षभर तर अन्य दुकाने खरीप हंगामात सुरू राहणारी आहेत. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने तब्बल ३६ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भोकरदन, अंबड आणि जालना येथील कृषीकेंद्रांची संख्या अधिक आहे. बदनापूर आणि परतूर तालुक्यातील कृषिकेंद्रांवर कीटकनाशक विक्री नियमांची बºयापैकी अंमलबजावणी होत असल्याने या तालुक्यांतील एकाही केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.-------------५० कृषिकेंद्र चालकांना नोटिसातपासणीमध्ये कृषी विभागाने विषारी, अतिविषारी कीटकनाशकांचा साठा तपासला . यात कीटकनाशकांच्या बाटलीवरील लाल रंगाचा त्रिकोण असलेल्या प्रतिबंधित अतिजहाल कीटकनाशकांचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० कृषिसेवा केंद्रांना आपला परवाना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली असून, कीटकनाशक विक्रीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे.