शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्हा मूल्यमापनात ३५ गावे ठरली पात्र

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेअंतर्गत सुरू असून यंदा ४६ पैकी ३५ गावे जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरली आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेअंतर्गत सुरू असून यंदा ४६ पैकी ३५ गावे जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरली आहेत. १५ आॅगस्टपुर्वी या गावांचे मूल्यमापन करून पुरस्कार पात्र ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी जिल्हा बाह्य समिती येणार आहे. महाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला. २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी तालुकानिहाय समित्यांचे गठन करण्यात आले होते. या समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ५ जून ते ५ जुलै या कालावधीत मूल्यमापन केले. जिल्हा मूल्यमापनामध्ये पात्र झालेल्या ३५ गावांमध्ये सेनगाव पोलिस ठाणे हद्दीतील शिवणी बु., धानोरा बु., भानखेडा, उटी पुर्णा, येलदरी, कवरदरी, तांदुळवाडी, वडहिवरा, बोरखेडी पी, सेनगाव, शिवणी खु. ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच गोरेगाव ठाणे हद्दीतील कानरखेडा खु., गारखेडा, वसमत तालुक्यातील हट्टा ठाणे हद्दीतील पळशी, हिंगोली ग्रामीण हद्दीतील खंडाळा, माळसेलू, आडगाव, वडद, पांगरी, राहोली बु., सावा, मालवाडी, लोहगाव, लिंबाळा मक्ता ही गावे पात्र ठरली आहेत. बासंबा ठाणे हद्दीतील चिंचोली, इसापूर रमणा, सिरसम बु., भटसावंगी, पळसोना, सावरगाव बंगला, दुर्गसावंगी, भटसावंगी तांडा, कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई, निशाना, वसई ही गावेही जिल्हा मुल्यमापनात पात्र झाली आहेत. त्यांचा अहवाल गृहमंत्रालयासह पोलिस महासंचालकांना महासंचालकांकडे सादर केला जाणार असल्याचे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानचे जिल्हा समन्वयक जमादार शेख निजाम यांनी सांगितले. १५ आॅगस्टपर्यत बाह्यमुल्यमापन समितीकडून तंटामुक्त गावांची तपासणी होणार आहे. दरम्यान, नर्सी ठाणे हद्दीतील पहेणी, घोटा, रिधोरा, जांभरूण खु.रोडगे, पुसेगाव, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, औंढा ठाणे हद्दीतील औंढा, वसमत ठाणे हद्दीतील गुंज, गोरेगाव ठाणे हद्दीतील गोरेगाव, हाताळा, चौंढी ही ११ गावे मोहिमेत सहभागी होऊनही यंदा मूल्यमापनाविनाच राहिली आहेत. (प्रतिनिधी)२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत असून प्रारंभी जनजागृतीअभावी प्रतिसाद मिळाला नव्हता.मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना महत्व पटवून दिले.जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ पैकी ३५ गावे या बाह्यमूल्यमापनास पात्र ठरली.२०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. ३५ गावांची तपासणी करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत जिल्हाबाह्य मूल्यमापन समिती हिंगोली जिल्ह्यात येणार आहे.