शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पैठण लिंकरोडसाठी ३.५ कोटींची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:24 IST

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पैठण लिंक रोडचे काम साडेतीन, तर बिडकीन ते पैठणपर्यंतचे २ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सोबतच नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयांतर्गत जालना रोडचे काम ९ कोटींतून, तर व्हीआयपी रोडचे काम ६ कोटींतून करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने लिंकरोडच्या कामाप्रकरणी वारंवार पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून साडेतीन कोटी डांबरीकरणासाठी मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देअसा होईल खर्च : जालना रोडवर नऊ कोटी, तर व्हीआयपी रोडवर सहा कोटींचा खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पैठण लिंक रोडचे काम साडेतीन, तर बिडकीन ते पैठणपर्यंतचे २ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सोबतच नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयांतर्गत जालना रोडचे काम ९ कोटींतून, तर व्हीआयपी रोडचे काम ६ कोटींतून करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने लिंकरोडच्या कामाप्रकरणी वारंवार पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून साडेतीन कोटी डांबरीकरणासाठी मंजूर केले आहेत.महावीर चौक ते हर्सूल टी-पॉइंट, पैठण लिंकरोड, केम्ब्रिज ते महावीर चौक व बिडकीन ते पैठण रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. वर्षअखेर ही कामे पूर्ण होतील, असा दावा करण्यात येत आहे. महावीर चौक ते हर्सूल हा अरुंद रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येणार आहे. दिल्लीगेट ते हर्सूलपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला पैठण लिंकरोड बांधकाम विभागाकडे खड्डेमय झाल्यावर हस्तांतरित करण्यात आला. मुंबईच्या कंत्राटदाराला ४५ कोटी देऊन रस्ते विकास महामंडळाने त्यात हात धुऊन घेतले. डिफेक्ट लायबिलिटी संपेपर्यंत कंत्राटदाराला महामंडळाने अभय दिले. दरम्यान, एमएसआरडीसीने त्या रस्त्याच्या हस्तांतरणाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले़१४ फेब्रुवारीपासून होणार ई-टेंडरिंग; २१ मार्चपर्यंत मुदतहर्सूल ते महावीर चौक रस्त्यासाठी ६ कोटी, केम्ब्रिज ते महावीर चौक म्हणजेच जालना रोडसाठी ९ कोटी २९ लाख हे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग करील, तर लिंक रोड साडेतीन कोटी, बिडकीन ते पैठण रोडसाठी २ कोटी रुपयांचे काम बांधकाम विभाग करील. या कामांसाठी १४ फेब्रुवारीपासून ई-टेंडरिंग सुरू होईल. २१ मार्च शेवटची तारीख आहे़२२ मार्च रोजी निविदा उघडण्यात येतील. कंत्राटदारांना सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट आहे़ दरम्यान, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले की, जालना रोड व व्हीआयपी रोडचे काम मागील तीन वर्षांपासून विविध कारणांनी ते रखडलेले आहे़ सा़ बां़ च्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्या कामांना मंजुरी मिळाली आहे.