शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2014 23:34 IST

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक पोलिसांनी १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल ३५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यांना धाक रहावा म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावत असतात़ त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विरूध्द दिशेने येणे, चौकामध्ये वाहन उभे करणे, परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट गाडी चालविणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, चालत्या वाहनावरून मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा यासह अनेक बाबींचा समावेश आहे़ वाहतूक पोलिसांच्या वतीने मांजरसुंबा ते गेवराई महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकाची तपासणी करण्यात आली़ तो मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आल्यास त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात येते़ त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात येतो़ यासह सिग्नल तोडून पळून जाणारे किंवा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलीस पावती फाडून दंड वसूल करतात़ वर्षभराच्या कालावधीत ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ हा आकडा नोव्हेंबरअखेरचा असल्याची माहिती पोलिस प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ गेल्या वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत ३२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ यात यावर्षी ३ लाख रूपयांची वाढ झाली आहे़ वारंवार कारवाया होत असल्याने वाहनधारकांनी धसका घेतला आहे़ परंतु कळत नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होतच असते़ दंड देऊनही नियमांचे उल्लंघन होत आहे़अधीक्षकांनी दिल्या सूचनावाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केल्या आहेत़ तसेच कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे़ वाहन पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती नेते मंडळींना फोन लावतात़ त्यामुळे वाहतूक पोलिसांवर दबाव निर्माण होतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर कराच, अडथळा आणणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सांगितले आहे़ (प्रतिनिधी)४२०१३ या वर्षांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ५६० वाहनांधारकांवर कारवाया करण्यात आल्या़४त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़४नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़