शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

जिल्ह्यात कला शाखेच्या ३५ टक्के जागा राहणार रिक्त

By admin | Updated: June 18, 2016 00:56 IST

लातूर : दहावीत विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, तंत्रनिकेतन, औद्यौगिक विकास अभ्यासक्रम,

लातूर : दहावीत विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, तंत्रनिकेतन, औद्यौगिक विकास अभ्यासक्रम, कृषी पदविका अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत़ परिणामी कला शाखेचे ६५ टक्के विद्यार्थीच प्रवेश घेणार असून, ३५ टक्के जागा रिक्त राहणार असल्याचे आतापर्यंत जिल्ह्यातील महाविद्यालयात झालेल्या प्रवेशावरून दिसते. लातूर जिल्ह्यात कला शाखेची एकूण २२० महाविद्यालये आहेत़ यात अनुदानित १४३, विनाअनुदानित ७७ महाविद्यालयांचा समावेश आहे़ लातूर शहरात २३ महाविद्यालय असून, ३१ तुकड्या आहेत़ वरीष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयात १२० विद्यार्थ्यांची तुकडी तर अन्य महाविद्यालयात ८० विद्यार्थ्यांची तुकडी आहे़ या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार ९२० इतकी आहे़ महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरु केली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढाही लातूर शहरातील नामांकित महाविद्यालयाकडे आहे. ११ वी कला वर्गासाठी थेट प्रवेश असूनही विद्यार्थ्यांची पाठ आहे. दयानंद महाविद्यालयात चार तुकड्या असून ४८० प्रवेश क्षमता आहे़ थेट प्रवेशाअंतर्गत २९० विद्यार्थ्यांनी थेट प्रवेश घेतले आहेत़ तर १०५ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे़ तर राजर्षी शाहू महाविद्यालयात ११ वी कलाच्या तीन तुकड्यांची ३६० प्रवेश क्षमता आहे़ २९६ विद्यार्थ्यांची पहिली प्रवेश यादी नोटीस बोर्डावर डकविण्यात आली आहे़ या महाविद्यालयातीलही मागच्या वर्षी ३० जागा रिक्त राहील्या होत्या़ बसवेश्वर महाविद्यालय कला शाखेच्या तीन तुकड्या असून, ६६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मागच्या वर्षीही १०० जागा रिक्त होत्या़ चाकूर तालुक्यात ११ महाविद्यालयांमधून १ हजार ३६० प्रवेश क्षमता आहे़ त्यापैकी केवळ २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १ हजार १७० जगा अद्यापही रिक्त आहेत़ अहमदपूर तालुक्यात ५ महाविद्यालये असून, ६४० प्रवेश क्षमता आहे़ २० जूनपासून प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे़ निलंगा तालुक्यात ७ महाविद्यालय असून, ९०० प्रवेश क्षमता आहे़ आतापर्यंत १३२ प्रवेश झाले आहेत़ तर ८१६ जागा रिक्त आहेत़ उदगीर शहरात ७ महाविद्यालये असून, ६०० प्रवेश क्षमता आहे़ १०० प्रवेश झाले असून, ५०० जागा रिक्त आहेत़ रेणापूर तालुक्यात १४ महाविद्यालय असून, ८६० प्रवेश क्षमता असून, १३६ प्रवेश झाले आहेत़ (प्रतिनिधी)