जालना : शहरात प्रमुख चौक तसेच मार्गावर निगराणी राहावी काही घटना अथवा अपघात घडल्यास तात्काळ माहिती मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी ३४ ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने पोलीस प्रशासनही हतबल झाले आहे. नगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी विशेष निधीतून प्रमुख तसेच मार्गावर ३४ सीसीटीव्ही लावले होते. वीज पुरवठ्यासाठी बॅटरी लावण्यात आली होती. मात्र, नियमित देखभाल होत नसल्याने हे कॅमेरे काही महिन्यांतच बंद पडले. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पालिका व पोलीस अधीक्षक कार्यालयातील कक्षातून होते. पोलीस नियंत्रण कक्षात दोन्ही मोठ्या टीव्हींवर शहरातील सर्व चित्र स्पष्ट होत होते. काही घटना घडल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन बंदोबस्त करण्यात येत होता. आता दोन महिन्यांपासून कॅमेऱ्यांचे प्रक्षेपण बंद झाले आहे. विशेष म्हणजे शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक ठप्प होत आहे. सीसीटीव्ही सुरू असते तरी वाहतूक ठप्पची माहिती नियंत्रण कक्षात कळून वाहतूक सुरळीत केली जात.
शहरातील ३४ सीसीटीव्ही दोन महिन्यांपासून बंद..!
By admin | Updated: December 25, 2016 00:06 IST