शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

३२०३ पैकी २६ अर्ज ठरले अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:17 IST

जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.साठी ३ हजार २०३ अर्ज १५ ते २२ ंसप्टेंबर या कालावधीत सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झाले होते. २५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये सरपंचपदासाठी आलेले ३ व सदस्यपदाचे २३ असे एकूण २६ अर्ज अवैध ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.साठी ३ हजार २०३ अर्ज १५ ते २२ ंसप्टेंबर या कालावधीत सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झाले होते. २५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये सरपंचपदासाठी आलेले ३ व सदस्यपदाचे २३ असे एकूण २६ अर्ज अवैध ठरले आहेत.जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी ७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत सरपंचपदासाठी ५५२ व सदस्यपदासाठी २ हजार ६५१ अर्ज दाखल झाले. या अर्जांची सोमवारी सकाळी ११ वाजेपासून छाननी सुरु झाली. यामध्ये परभणी तालुक्यातील साडेगाव येथील पांडुरंग मारोतराव देवडे, पिंगळी येथील सागर गोपीनाथ खिल्लारे, विठ्ठल गौतम सावंत, पिंपरी देशमुख येथील प्रकाश बालासाहेब राजगुरे, नांदखेडा येथील जानका धोंडीबा आहेरकर यांची सदस्यपदासाठी दाखल केलेले अर्ज अवैध ठरले. तर नांदखेडा येथील शकुंतला प्रकाशराव जोंधळे यांनी सरपंचपदासाठी दाखल केलेला अर्ज छाननी अवैध ठरला. पूर्णा तालुक्यातील पिंपरण येथील रमाबाई भीमराव धूतराज, कानडखेड येथील रजियाबी युसूफ खान पठाण, धनगर टाकळी येथील चौतरा सावळाराम साखरे, गौर येथील मिनल विलास जोगदंड, सूमनबाई बेलाजी पांचाळ या पाच जणांचा सदस्यपदासाठीचा अर्ज बाद ठरला आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील २, डिग्रस जहांगीर येथील १, मालेटाकळी येथील १, बोरकिनी येथील १ असे एकूण सदस्यपदासाठीचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत. पाथरी तालुक्यातील सदस्यपदासाठीचे २ अर्ज अवैध ठरले आहेत. मानवत तालुक्यातील मानोली येथील सदस्यपदासाठीचा कौसा रावसाहेब कनकुटे यांचा अर्ज बाद ठरला आहे. सोनुळा येथील शांता गंगाधर सोनटक्के, आशामती सूर्यभान सोनटक्के हे सरपंचपदासाठीचे अर्ज बाद ठरले आहेत. जिंतूर तालुक्यातील सदस्यपदासाठीचे ५ अर्ज बाद ठरले आहेत. पालम, सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील ग्रा.पं. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जापैकी एकही अर्ज अवैध ठरला नाही.