शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३२0 डॉक्टरांना लावला दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:36 IST

हिंगोली : दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर व इतर रुग्णालयांच्या झालेल्या तपासणीत ३२0 डॉक्टरांकडे परवानाच नसल्याचे आढळून आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर व इतर रुग्णालयांच्या झालेल्या तपासणीत ३२0 डॉक्टरांकडे परवानाच नसल्याचे आढळून आले होते. त्यांना आता जिल्हास्तरीय समितीने प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई आता सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात बोगस डॉक्टर तपासण्यासह रुग्णालय तपासणीची मोहीम राबविली होती. यात जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टरांची ४२२ रुग्णालये तपासली. मात्र त्यापैकी ३२0 जणांकडे बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार परवाना घेतलेला आढळला नाही. त्याचबरोबर इतरही अनेक त्रुटी तपासणीत आढळल्या होत्या. ही तपासणी जिल्हास्तरीय समितीच्या आदेशाने झाली होती. या समितीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी अध्यक्ष तर जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सर्व न.प. मुख्याधिकारी, डीएचओ तर सदस्य सचिव हे जिल्हा शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी यांचा समावेश होता.दोन महिन्यांपूर्वी रुग्णालय तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल नुकत्याच झालेल्या बैठकीत ठेवला होता.त्यात परवाना न आढळलेल्या व त्रुटी असलेल्या ३२0 रुग्णालयांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्याच्या नोटिसा तयार करण्याचे काम सध्या सामान्य रुग्णालयाकडून सुरू आहे. देण्यात येत असलेल्या नोटिसीत संबंधित रुग्णालयात आढळलेल्या सर्व त्रुटींचा गोषवाराही दिला जाणार आहे. तर या त्रुटी दूर करण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णालयांना आपल्या भोंगळ कारभाराला लगाम घालावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.