ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 4 - सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव- आमठाना येथील एका सावकाराच्या घरातून सिल्लोड येथील सहाय्यक निबंधकांनी झडती घेवून 32 राजिस्ट्रय जप्त केल्या. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप या सावकारावर करण्यात आल्याने बुधवारी ही मोठी कार्यवाही करण्यात आली.असल्याची माहिती पथक प्रमुख म्हणून डी.डी.जायस्वाल यांनी दिली.अधिक माहिती अशी की आज सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव,आमठाना येथील काशीनाथ गंगाधर काटेकर या सावकराच्या घर व दुकानावर एकाचवेळी सिल्लोड येथील सहाय्यक निबंधकांनी छापे मारून तब्बल ३२शेतजमिनींचे खरेदी खतासहित करारनामे व अनेक दस्तावेज जप्त केली. जप्त केलेल्या कादपत्रांची पड़ताळनी सुरु आहे.सावकर काशीनाथ गंगाधर काटेकर च्या विरोधात सरुबाई जाधव,शिवाजी विट्ठल जाधव,कोंडीराम भिका जाधव तिघे रा.पेंडगाव आमठाना ता.सिल्लोड यांनी अवैद्य सावकारी करुण गोरगरीब शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांची आर्थिक लुबाडणुक करुन अनेक लोकांना 5 ते 10 रूपये शेकडा दराने पैसे वाटप करुण जमिनी हडप केल्याच्या तक्रारी केल्या होत्या.जमिनी हडपल्या मुदलापेक्षा जास्त पैसे अदा करुण देखील शेत परत न केल्याने तसेच अधिकच्या पैशाची मागणी करुण धमक्या दिल्या प्रकरणी अनेक शेतकऱ्यांनी सिल्लोड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दिली होती.या तक्रारीवरुण ही कारवाई करण्यात आली.यांनी केली कारवाईचौकशी व घर झड़ती कामी पथक प्रमुख म्हणून डी.डी.जायस्वाल सहकार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यानुसार त्यांनी राजेश सुरवसे(विभागीय सह.निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद),सतीश खरे(जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद),डी.आर.मातोरे(सहायक निबंधक सहकारी संस्था सिल्लोड),शंकर शिंदे(सपोनी ग्रामीण सिल्लोड),यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदार यांना सोबत घेऊन काटेकर याच्या घर व दुकानावर सकाळी ०९:३० वाजेच्या दरम्यान धाड़ मारून ३२ शेत जमिनीचे खरेदी खतसहित करारनामे,व्यवहाराच्या नोंदी असलेल्या सहा नोंदवह्या अशी दस्तावेज जप्त केली.या धाडीमध्ये संगीता शिंदे, एस.वाय.पठाण, बी.डी.कुंभारे यांनी मदत केली.50 हजाराचे भरले 2 लाख 50 हजार या सावकारकडून मी पन्नास हजार रूपये 7 रूपये शेकडा व्याज दराने घेतले होते. त्या पोटी १२३ आर शेत जमीन धर म्हणुन सावकाराच्या नावाने परत पलटुन देण्याच्या बोलिवर लिहून दिली होती.आतापर्यंत दोन लाख पन्नास हजार रु अदा करूनही शेतजमिन पलटुन दिली नाही व आणखी चार लाख पन्नास हजार रुपयांची मागणी करीत आहे.- सरुबाई जाधव शेतकरी पेंढगाव-आमठाना60 हजाराचे वसूल केले 3 लाख मी या सावकारकडून 60 हजार रूपये दहा रु शेकडा दराने घेतले होते. या बदल्यात तीन लाख रुपये परत दिले. शेतजमिनीचा ताबा बळजबरीने घेऊन आणखी सात लाख रुपये न दिल्यास जमीन दुसऱ्यास विक्री करण्याची धमकी या सावकाराने दिली.- शिवाजी विट्ठल जाधव शेतकरी पेंढगाव- आमठानाएक एकर जमीन हड़पली या सावकारकडून मी साठ हजार रुपये व्याजाने घेतले होते. दोन एक्कर शेत जमीन धर म्हणुन सावकाराच्या नावाने परत पलटुन देण्याच्या बोलिवर करुण दिली यापैकी त्यांनी एक एक्कर शेत जमीन पलटुन दिली होती. उर्वरित 1 एक़्क़र जमीन मुद्दल व व्याजपोटी हड़पली एक लाख पन्नास हजार रुपये घेउनही जमीन पलटून दिली नाही. व आणखी तीन लाख रुपयाची मागणी केली.- कोंडीराम जाधव शेतकरी पेंढगाव -आमठानाया धाडीत सापळलेल्या खरेदिखतांच्या कागदपत्रांची तपासणी करुण ज्यांनी खरेदी खत लिहून दिले आहे त्यांचे जवाब घेण्यात येऊन चौकशी नंतर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८ नुसार जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांच्याकडे जमीन परत करने संबंधी प्रकरण सादर करणे बाबत अहवाल सादर करण्यात येईल.तसेच तालुक्यात आवैधरित्या कोणी सावकार कोणाची पिळवणुक करीत असेल आशा नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन डी.डी.जायस्वाल, सहकार अधिकारी, सिल्लोड यांनी केले आहे.
पेंढगाव येथील सावकाराच्या घरातून 32 रजिस्ट्रर जप्त
By admin | Updated: January 4, 2017 21:00 IST