शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

३०० गायकांनी गाजविली ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा

By admin | Updated: November 3, 2016 01:34 IST

औरंगाबाद : ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीत, सुगम गीत, चित्रपट गीत’ ही सर्व प्रकारची गाणी ताकदीने गाऊन ३०० हौशी कलाकारांनी ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा गाजविली.

औरंगाबाद : ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीत, सुगम गीत, चित्रपट गीत’ ही सर्व प्रकारची गाणी ताकदीने गाऊन ३०० हौशी कलाकारांनी ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा गाजविली. हौशी असले तरीही अनेक जण पट्टीचे गायक निघाल्याने अंतिम स्पर्धेसाठी ३३ गायकांची निवड करणे ही परीक्षकांसाठी परीक्षाच ठरली. मारवाडी समाजातील १७ पोटजातीतील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सकल मारवाडी युवा मंचतर्फे २४ ते २६ आॅक्टोबरदरम्यान ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा घेण्यात आली. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित स्पर्धेत समाजातील उदयोन्मुख गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते. या स्पर्धेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत ३०० गायकांनी आपल्या आवाजाची मोहिनी समाजबांधवांना घातली. व्यावसायिक गायकांच्या तोडीस तोड गाणे गाऊन हौशी गायकांनी ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखविले. ३०० गायकांमधून उपांत्य फेरीसाठी ७७ गायकांची निवड करण्यात आली. २६ रोजी उपांत्य फेरीला सकाळी सुरुवात झाली. रात्री १२ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. यानंतर परीक्षक पं. विश्वनाथ दाशरथे, शांतीभूषण चारठाणकर व राजश्री ओक यांना अंतिम स्पर्धेसाठी २५गायकांची निवड करायची होती. गायकांची निवड करणे खऱ्या अर्थाने परीक्षक असलेल्या संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांचीही परीक्षाच ठरली. त्यांनी अंतिम स्पर्धेसाठी ३३ जणांची निवड केली. यामध्ये १४ वर्षांखालील ९ स्पर्धक, १५ ते ४९ वयोगटातील १८ तर ५० वर्षांवरील ६ स्पर्धक, अशा ३३ गायकांची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख आशिष सोमाणी, आशिष मेहता, नीलेश पहाडे, नरेश मोर, अनुप काबरा, नितीन भक्कड, विकास पाटणी, रवी रांदड आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.