शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची ३00 दुकाने बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत.

मुजीब देवणीकर। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत. अनेकांचे करार संपले आहेत. काही भाडेकरूंनी चक्क दुकानेच विकून टाकली आहेत. या भाडेकरूंवर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे मनपात एकच खळबळ उडाली असून, जुने रेकॉर्ड शोधून तब्बल ३०० दुकानांना लवकरच सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.नगर परिषद आणि मनपाच्या कार्यकाळात शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले आहेत. या संकुलांमधील ९० टक्के दुकाने राजकीय मंडळींनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काहींनी ३० वर्षांच्या करारावर तर काहींनी दरवर्षी भाडेपट्टा ठरवून दुकाने घेतली. मागील २५ ते ३० वर्षांपासून भाडेकरू मनपाला एक रुपयाही देत नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली होती. मागील आठवड्यात यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळवून मागील आठ दिवसांपासून जुने रेकॉर्ड शोधणे सुरू केले आहे. हे रेकॉर्ड पाहून अधिकारी व कर्मचारीही अवाक् झाले आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या यादीनुसार ३०० जणांचे भाडेकरार केव्हाच संपले आहेत. अनेकांनी दुकाने दुसऱ्यांच्या नावावर करून टाकली आहेत. काही भाडेकरूंनी बाँडपेपरच्या आधारे दुकानांची विक्रीच करून टाकली आहे. महापालिकेने भाडेकरूंसोबत करार करताना जे भाडे ठरवून दिले होते ते भाडेसुद्धा आजपर्यंत भरण्यात आलेले नाही. दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा या निमित्ताने सहन करावा लागत आहे.