शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्याला औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:10 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यासाठी औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार आहेत. हजारो शिवसैनिक निघण्याच्या तयारीत होते; मात्र अनेकांना स्थानिक पातळीवरच राममंदिर, शिवसेना शाखांमध्ये महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यासाठी औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार आहेत. हजारो शिवसैनिक निघण्याच्या तयारीत होते; मात्र अनेकांना स्थानिक पातळीवरच राममंदिर, शिवसेना शाखांमध्ये महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुख अयोध्येला २४ व २५ सप्टेंबर रोजी राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात जाणार आहेत. या दौºयाची देशभर चर्चा सुरू आहे. वातावरणनिर्मिती करण्यासाठी औरंगाबाद शहरात जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, तसेच नियोजनासाठी अयोध्येला गेलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांमध्ये औरंगाबादच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. याविषयी अंबादास दानवे यांना विचारले असता, त्यांनी अयोध्येच्या दौºयाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादेतून ११ जण चार दिवसांपूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि.२१) आणखी ३५ जण रेल्वेने दाखल होत आहेत, तर २४ तारखेला ३०० पेक्षा अधिक पदाधिकारी, शिवसैनिक दाखल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येकडे निघाले होते; मात्र अयोध्येत ज्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाआरती करणार आहेत त्यावेळी स्थानिक पातळीवर प्रत्येक मंदिर, पक्ष कार्यालय, शाखांमध्ये महाआरती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अनेकांना स्थानिक पातळीवरच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. यामुळे ३०० पदाधिकारीच अयोध्येला जातील, असेही दानवे यांनी सांगितले.संवादाच्या माध्यमातून सभाच होणारपक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत २५ सप्टेंबर रोजी जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर सभा होणार नसल्याचेही वृत्त आले. याविषयी अंबादास दानवे म्हणाले, सभा होणार नाही. जनतेशी संवाद साधणार आहेत. हा संवादच सभेच्या स्वरूपात होईल. त्यामुळे सभा आणि संवाद सारखेच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण