शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३०० डॉक्टर धावले

By admin | Updated: July 10, 2017 00:37 IST

बीड : आरोग्य, व्यायाम आणि धावण्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएनशच्या वतीने रविवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आरोग्य, व्यायाम आणि धावण्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएनशच्या वतीने रविवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३०० डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला.डॉक्टर डे चे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनने आठवडाभरात विविध उपक्रम राबविले. या उपक्रमाचा समारोप रविवारी मिनी मॅरेथॉनने झाला. सकाळी नगर रस्त्यावरील अन्नतंत्र महाविद्यालयाजवळ सर्व डॉक्टर एकत्रित आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिलीप खरवडकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल बारकूल, सचिव डॉ. संतोष शिंदे तसेच संयोजक डॉ. दिवाकर गुळजकर, डॉ. सुधीर हिरवे, डॉ. आप्पासाहेब बागलाणे, डॉ. सुनील नाईकवाडे, डॉ. विश्वास गवते, डॉ. विजय कट्टे यांच्या उपस्थितीत फ्लॅग आॅफ करुन मिनी मॅरेथॉनला प्रारंभ झाला. अन्नतंत्र महाविद्यालय ते म्हसोबा फाटा - पिंपरगव्हाण रोड असा मॅरेथॉनचा मार्ग होता. या मॅरेथॉनमध्ये डॉक्टर दाम्पत्यांनीही सहभाग नोंदवला. बीड, पाटोदा, वडवणी, शिरुर तसेच इतर तालुक्यातील डॉक्टरांनी मॅरेथॉनमध्ये उत्साह दाखवला. ७ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील गटामध्ये डॉ. शशीकांत दहिफळकर प्रथम विजेते ठरले. डॉ. भगवान अतकरे आणि डॉ. किरण कोळेकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिले. ५० वर्षापुढील गटामध्ये डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे प्रथम आले. डॉ. सुदाम मोगले, डॉ. विजय सिकची यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.३ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील गटात डॉ. राजू जाधव, डॉ. सावरे आणि डॉ. राऊत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. ५० वर्षापुढील गटात डॉ. राजीव घुगे हे प्रथम विजेते ठरले. डॉ. सुभाष जोशी आणि डॉ. एस. के. तांदळे यांना संयुक्त द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आला.७ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाआतील महिलांच्या गटात डॉ. संध्या हुबेकर, डॉ. किरण हिरवे, डॉ. कल्पना दामा प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या. ५० वर्षापुढील गटात डॉ. विनिता ढाकणे, डॉ. विनया राऊतमारे प्रथम व द्वितीय आल्या.३ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील महिलांच्या गटात डॉ. रेणुका खिस्ती, डॉ. कविता वीर, डॉ. रीटा शहाणे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. ५० वर्षापुढील गटात डॉ. संध्या घुगे या प्रथम स्थानी राहिल्या. डॉ. सीमा जोशी आणि डॉ. सुरेखा देशपांडे या द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या.