शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: March 30, 2017 23:43 IST

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते.

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा शासनाने आपला आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम विमा कंपनीकडून अदा करण्यात आली असून, सध्या ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत २ लाख ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना १०२ कोटी ९३ लाख ८६ हजार ५९२ रुपये उपलब्ध झाले आहेत. बँकेने संबंधित शाखांकडे ही रक्कम वर्ग केली असून, अवघ्या एक-दोन दिवसांत वाटपास सुरुवात होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने जिल्हा बँकांचे थकित कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून ५० टक्के रक्कम कपात करण्याचे आदेश जिल्हा बँकांना गुरुवारी दिले होते. या आदेशाची माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे जिल्हा बँकांचे व्यवस्थापक शासनाच्या आदेशाची माहिती मिळविण्यासाठी वारंवार शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर व आपल्या ई-मेलवर पाहणी करीत होते. शासनाचा हा आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचण्याअगोदरच सरकारने आपले आदेश मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड केली नव्हती. हे कर्ज ६६ कोटी २७ लाख रुपये आहे. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरून पीकविम्यातून थकीत कर्ज वसूल करणार असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. संतापही व्यक्त केला जात होता. मात्र शासनाने सदर आदेश मागे घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)