शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पोळ्यासाठी ३० लाखांवर नारळांची आवक

By admin | Updated: September 1, 2016 01:03 IST

राजेश खराडे , बीड वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे

राजेश खराडे , बीडवर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे. बीडमध्ये महिनाभराच्या विश्रांतीनंतर पोळ्याच्या दोन दिवस आधी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांत पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठही फुलली असून बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साजश्रृंगार खरेदीची लगबग सुरु आहे. खास सणानिमित्त ३० लाख नारळाची आवक झाली आहे.सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पीक चांगले आले. मात्र, महिन्यापासून वरुणराजा रुसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नैराश्येचे वातावरण निर्माण होऊ लागले होते. दोन दिवसांपूर्वीच पावसाने जोरदार ‘कमबॅक’ केले. त्यामुळे निराशा झटकून शेतकरी पोळा धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी उत्साहाने बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. बीडमधील मोंढ्यात बुधवारी खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी लाडक्या सर्जा- राजासाठी कासरा, सर, मोरखी, वेसन, झूल, बाशिंग खरेदी करत होते. पोळ्यादिवशी बैलांना नवरदेवाप्रमाणे सजवून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पुरणपोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. यंदा बैलांच्या पायात घालण्यासाठी घुंगराचा चाळ व शिंगावर लावण्याकरता तुरा सर हा नवीन साज बाजारात आला आहे. साजसाहित्याच्या किंमती स्थिर असून पाऊस झाल्यामुळे शेतकरी जोमाने खरेदी करत असल्याचे विक्रेते विवेक चरखा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तपोळ्यादिवशी मिरवणुकीदरम्यान वाद, विवाद होतात. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. राज्य राखीव दलाची एक तुकडी मागविली असून स्थानिक पोलीस बंदोबस्तावर असतील. त्यांच्या दिमतीला ३०० पुरुष व १०० महिला होमगार्ड कर्तव्यावर राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संवेदनशील गावांत पोलिसांची जादा कुमक तैनात राहणार आहे. पोळा सण शांततेत साजरा होईल, यादृष्टीने सर्वतोपरी उपाय केल्याचे नरवाडे म्हणाले.पोळ्यादिवशी काळ्याआईसह शिवारातील साऱ्या देवदेवतांची पूजाअर्चा केली जाते. त्यासाठी नारळ खरेदी मोठ्या प्रमाणावर असते. तामिळनाडू, आंध्रप्रदेशातून यंदा ३० लाखांवर नारळांची आवक झाली असून किंमतीत निम्म्याने घट आहे. गतवर्षी १२०० ते १४०० रुपयांपर्यंत गेलेले दर यंदा ५०० ते ७०० रुपये शेकडा इथपर्यंत गडगडले आहेत. बीडमधून औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही नारळाची होलसेल विक्री होते, असे व्यापारी केदारनाथ झंवर यांनी सांगितले.