शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडियमवर साकारतोय तीस फूट उंच सभामंडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 00:05 IST

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात २१ एप्रिलपासून होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तयारी सुरू आहे.

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात २१ एप्रिलपासून होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तयारी सुरू आहे. मुख्य रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून, शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य सभामंडप उभारला जात आहे. विशेष म्हणजे क्रीडा संकुलावर एकही खड्डा न घेता आधुनिक सामग्रींचा वापर करून हा रंगमंच उभारला जात आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात पहिल्यांदाच अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या पर्वणीचा योग आला आहे. त्यासाठी संयोजन समितीच्या वतीने जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. क्रीडा संकुलाच्या परिसरात ६८ हजार स्क्वेअर फूट आकाराचा ३० फूट उंच भव्यदिव्य असा मुख्य सभामंडप उभारण्यात येत आहे. उस्मानाबाद शहरात पहिल्यांदाच नाट्यसंमेलनाच्या रुपाने अशा पद्धतीचा भव्य सभामंडप उभारला जात आहे. क्रीडा संकुलावर उभारणी करताना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, याची दक्षता संयोजन समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. आधुनिक सामग्रीचा वापर करून उभारण्यात आलेल्या सभामंडपात एकाही ठिकाणी खड्डा खोदण्याची वेळ आली नाही. या व्यतिरिक्त नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुल आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या ठिकाणीही स्वतंत्र दोन रंगमंच उभारले जात आहेत. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचालगत भव्य ग्रंथप्रदर्शनासाठी स्टॉल्सची उभारणी केली जात आहे. प्रकाशन संस्थांनी आपली नावे संयोजन समितीकडे नोंदवावी, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.