शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर हॉस्पिटलसाठी ३० कोटींची यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:34 IST

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. या निधीतून २७ प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामग्रींची खरेदी होईल. यामुळे हे रुग्णालय आगामी काही महिन्यांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे. त्याचा राज्यभरातील गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने २०१६ मध्ये केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यादृष्टीने २९ जुलै २०१६ रोजी केंद्राच्या तीन सदस्यीय पथकाने रुग्णालयाची पाहणी केली होती. राज्य कर्करोग संस्थेसाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के निधी राहणार आहे, तर राज्य शासनाचा ४० टक्के आहे. याअंतर्गत केंद्र सरकारचा ४३ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला. रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रींचा प्रस्ताव देण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात २९.९० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. आगामी काही महिन्यांत खरेदी प्रक्रिया होऊन ही यंत्रसामग्री रुग्णसेवेत दाखल होईल. या यंत्रसामग्रींमुळे रुग्णालय अधिक अद्ययावत होईल,असे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.