शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

२ हजार रुपये किमतीच्या कूलरला ३ हजार भाडे

By admin | Updated: May 25, 2016 00:28 IST

औरंगाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरण कंपनीत अजूनही लहान सहान गोष्टींवर पैशांची उधळपट्टी सुरू आहे.

औरंगाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरण कंपनीत अजूनही लहान सहान गोष्टींवर पैशांची उधळपट्टी सुरू आहे. कंपनीच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात उन्हाळ्यापुरते भाड्याचे ४३ कूलर बसविण्यात आले आहेत. मात्र या कूलरचे दीड महिन्याचे भाडे हे त्यांच्या खरेदी किमतीपेक्षाही अधिक आहे. दोन हजार रुपये खरेदी किंमत असलेल्या एकेका कूलरला येथे दिवसाकाठी ६५ रुपये याप्रमाणे प्रत्येकी दीड महिन्याचे तीन हजार रुपये अदा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.वीजचोरी आणि थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. म्हणून वीजचोरी आणि थकबाकी वसुलीच्या कारणावरून कंपनीत उलथापालथ सुरू आहेत. वीज बिल वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र कंपनीतील अवास्तव खर्च मात्र सुरू आहे. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात सध्या कूलरच्या भाड्यावर अशाच पद्धतीने खर्च केला जात आहे. परिमंडळ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्याच्या आवरणाचे ४३ कूलर बसविण्यात आले आहे. हे सर्व कूलर भाड्याचे आहेत. यामध्ये काही कूलर लहान तर काही मोठ्या आकाराचे आहेत. सर्व कूलर लोकल मेड आणि लोखंडी पत्र्याच्या आवरणाचे आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे कूलर ४५ दिवसांसाठी भाड्याने घेतले असून प्रत्येक कूलरचे दिवसाचे भाडे ६५ रुपये इतके आहे. म्हणजेच ४५ दिवसांचे एका कूलरचे भाडे हे ३ हजार रुपये इतके होते. यातील लहान आकाराच्या कूलरची खरेदी किंमतच १५०० रुपये ते २ हजार रुपये या दरम्यान आहे. तर मोठ्या आकाराचे कूलरही अडीच हजार ते तीन हजार रुपये दरात मिळते. असे असताना महावितरणकडून प्रत्येक कूलरला ३ हजार रुपये म्हणजे खरेदी किमतीपेक्षा अधिक भाडे अदा केले जात आहे. मी औरंगाबादेतील कार्यालयात नुकताच रुजू झालो आहे. कूलरवरील खर्चाविषयी अजून मला माहिती नाही. परंतु मी त्याविषयी माहिती घेईन. - सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता