शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

By admin | Updated: May 12, 2017 00:29 IST

जालना : अभियांत्रिकी व औषधी निर्माणशाास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील विविध महाविद्यालयांतील १३ केंद्रावर ३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अभियांत्रिकी व औषधी निर्माणशाास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील विविध महाविद्यालयांतील १३ केंद्रावर ३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली.जिल्ह्यातील ४ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंंद्रावर पोलिसांकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर पालकवर्गाची मोठी गर्दी दिसून आली. सकाळी १० ते ११.३० या दरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पहिला गणिताचा पेपर घेण्यात आला. मध्यांतरानंतर १२.३० ते २ वाजेपर्यंत भौतिकशास्त्राचा रसायनशास्त्राचा पेपर घेण्यात आला. ३ ते ४.३० वाजेच्या कालावधीत औषधीनिर्माण शास्त्र विषयाचा परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पारदर्शक पॅड, पेन नेण्यास मुभा देण्यात आली होती. तर स्मार्ट वॉच, मोबाईल, कॅलक्युलेटर किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा केंद्रात आणण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने अनेकांना वेळ बघता आली नसल्याचे सांगितले. शहरातील १३ केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. शहरातील सर्वच रस्त्याचे कामे सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहण्यास अडणची येऊ नये तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या खोळंबल्यामुळे परीक्षेस विलंब होऊ नये यासाठी अर्धातास आधीच निघण्याचे आवाहन परीक्षा नियंत्रक तथा उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते.दावलवाडी शिवारातील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, एम. एस. जैन इंग्रजी शाळा, सेंट मेरी हायस्कूल, रेयान इंटरनॅशलन स्कूल, सीटीएमके गुजराती विद्यालय, आदी केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.