शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३ टक्केच पाणी

By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड सरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडसरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत जिल्हयात केवळ ३.०५ टक्केच पाणी शिल्लक आहे. बीड जिल्हयात एकूण मोठे, मध्यम व लघु असे १४२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ३.०५ टक्के तर २६.९९ दलघमी पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पात माजलगाव धरणात ७५ दलघमी (मृतसाठा) पाणी आहे. तर केज तालुक्यातील मांजरा धरणात केवळ २.६५३ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. हे दोन्ही मोठे धरण गतवर्षी अल्प पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.पाणीसाठ्याचा उपसा बेसुमारजिल्हयातील पाणी साठा केवळ ३ टक्यावर येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सिंचन प्रकल्पातील अवैध पाणी उपसा थांबवला नाही तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आवघड होण्याची चिन्हे आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून सहा ते सात महिन्याचा आवधी आहे. अशी परिस्थिती उदभवलेली असताना देखील अवैध पाणी उपसा रोकण्याच्याची जबाबदारी दिलेल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र जिल्हयात आहे.५० टक्के पाणीसाठा असलेले प्रकल्पएकूण १२४ लघु प्रकल्पापैकी केवळ सहा सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध आहे. खटकळी (बीड), धामनगाव (आष्टी), भोगलवाडी (धारूर), साकूड (अंबाजोगाई), सुलेमान देवळा (आष्टी) या तालुक्यांचा समावेश आहे.सतत तीन वर्ष पावसाने दडी मारल्याने भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. बोअर, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. आज घडीला बीड जिल्हयातील १४०४ गावांपैकी २३५ गावांवर टंचाईचे सावट असून शासन सदरील गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवित आहे. यासाठी एकूण १६० टँकर जिल्हयात सुरू आहेत.जिल्हयात मध्यम प्रकल्पांची संख्या १६ आहे. यापैकी केवळ तीन प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. महासांगवीत ०.७३० द.ल.घ.मी, वाणमध्ये ३.८८५ तर कुंडलिकामध्ये १२.५०० इतका पाणीसाठा शिल्लक आहे.