लातूर : शेतीला जोडधंदा म्हणून लातूर जिल्ह्यातील दीडशे शेतकऱ्यांनी रेशीमचे उत्पन्न घेण्यासाठी तुतीची लागवड केली़रेशीमचे चांगले संगोपन केले़ रेशीम शेतीमधून वर्षाकाठी तीन कोटीचे उत्पन्न घेतले आहे़परिणामी, शेतकऱ्यांचा ओढा रेशीम उद्योगाकडे वळला असल्याचे दिसून येत आहे़रेशीम उद्योग म्हणजे तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन, त्याची विक्री, रेशीम धागा, कापड, व्यापार करूण आर्थिक उत्पन्न मिळविले जात आहे़ हा उद्योग शेतीला जोडधंदा म्हणून पुढे येत आहे़ तुती लागवडीसाठी ६ हजार ७५० रूपये अनुदान मिळते़ तर नर्सरीसाठी एकरी १० हजारांचे अनुदान दिले जात आहे़ कोषनिर्मितीसाठीच्या कोषासाठी ८७ हजार ५०० रूपये अनुदान, ठिंबकसाठी ७५ टक्के अनुदान, ३७ हजाराचे साहित्य, आदी माध्यमातून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे़ त्यामुळे रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ २०१४-१५ मध्ये दीडशे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून तुती लागवड करून उत्पन्न घेण्यासाठी तुतीची लागवड केली़ महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयाच्या वतीने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली. वर्षभरात तीन कोटींचे उत्पन्न मिळविले़ कोषाची खरेदी शासनाच्या वतीने मुरूड येथे सुरू केलेल्या केंद्रात १८ हजार रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे केली जात आहे़ परंतु शासनाच्या केंद्रापेक्षा कर्नाटकात खाजगी केंद्रात जास्तीचा ३५ ते ५० हजार रूपये प्रतीक्विंटल कोषाला भाव मिळत असल्याने शेतकरी तुतीच्या कोषातून रेशीम उद्योग व रेशीम उत्पन्नातून नगदी पैसा देणाऱ्या उत्पन्नाकडे वळला जात आहे़ परिणामी, तुती लागवडीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे़ ही संख्या २०० वर गेली आहे़ शेतीला जोडधंदा म्हणून तुती लागवडीच्या उद्योगाकडे वळत आहेततुती लागवड, संवर्धन, व कोषउत्पादन यातून खेळते भांडवल हाती पडत असल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. (प्रतिनिधी)कोष उत्पादनात लातूर-औसा आघाडीवरलातूर कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रेणापूर तालुक्यात ३२ एकर, चाकूर, अहमदपूर २४ एकर, निलंगा, उदगीर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ, तालुक्यातून ३९ एकरवर, लातूर व औसा तालुक्यात ४४ हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली असून जिल्हाभरात तुतीच्या कोष उत्पादनात औसा-लातूर हे तालुके आघाडीवर आहेत़ तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून,बेणे खरेदी करून तुती लागवडीसाठी मिळणाऱ्या व इतर अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रक्षेत्र अधिकारी बी़एऩसूर्यवंशी यांनी केले आहे़
रेशीम उद्योगातून वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल
By admin | Updated: July 20, 2014 00:33 IST