शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST

अशोक अनगुलवार , हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.

अशोक अनगुलवार , हिमायतनगरतालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.२००७ मध्ये शेतकऱ्यांच्या १०७ हे. जमीनीचा मावेजा ८० टक्के २०११ मध्ये मिळाला. नवीन रेटप्रमाणे शेतकऱ्यांना दीड कोटीचा डिफरन्स मिळणार असल्याचे अधीक्षक अभियंता कुरुडे यांनी सांगितले. दरेसरसम साठवण तलावात दरेसरसम, आंदेगाव, पवना येथील जमिनी गेल्या आहेत. या साठवण तलावावर लिफ्ट इरिगेशन केल्यास २९४ हे. जमीन पाण्याखाली येणार आहे. परंतु शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा न मिळाल्याने गेल्या ५ वर्षापासून हा साठवण तलाव कोंडण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. पोट भरण्याचा जमिनीचा तुकडाच दरेसरसम साठवण तलावात गेल्याने व २००७ च्या रेटप्रमाणे मिळणारा मावेजा २०११ मध्ये देत असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यावर हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना, पोट, दुधड पिचोंडी हे तलाव असून सुना, पवना, दुधड, पोटा तलावामुळे त्या त्या भागात सिंचनाची व्यवस्था झाली. खरीप, रब्बी, बारमाही पीक शेतकरी घेत आहे. तालुक्यात पैनगंगा नदी असल्याने नदीकाठच्या १५ ते २० गावाला त्याचा लाभ मिळत आहे. पैनगंगा नदीवर गाजेगाव व वारणटाकळी येथे बंधारा आहे. त्यामुळे बरेच शेतकरी ऊसाचे पीक घेत आहेत.तालुक्यात २९ हजार ५० विहिरी आहेत. शेतजमीनही नदीकाठची चांगली आहे. बाकी चरडभरड, मध्यम आहे. दरेसरसम साठवण तलाव कोंडला तर शेतकऱ्याची २९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येवून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या साठवण तलावामुळे दरेसरसम, पवना, आंदेगाव, सरसम, खडकी, पार्डी, टेंभी आदी गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे शक्य दिसत नाही.अस्तित्वात असलेले पवना, सुना, पोटा, दुधड, पिंचोर्डी तलावात मोठा गाळ साचला आहे. हा साचलेला गाळ दरवर्षी काढणे आवश्यक आहे. गाळाचे महत्व अद्यापही शेतकऱ्यांना पटले नाही. शेतकरी रासायनिक खतालाच प्राधान्य देत आहे.पाचही साठवण तलावात गाळाबरोबर बेशरम, झुडपे, वनस्पती वाढल्याने तलाव उथळ होवून साठवण क्षमता कमी झाली आहे. लोकसहभागातून हा गाळ काढणे आवश्यक आहे. ४ ते ५ कि.मी. पाणीपातळी वाढणारस्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार शासनस्तरावर मावेजा मिळावा व धरण तयार होवून ते कोंडण्यास शेतकऱ्यांनी परवानगी द्यावी यासाठी जि.प. सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमेटीचे सभापती दत्तराम पा. करंजीकर आणि अधीक्षक अभियंता कुरुडे, कार्यकारी अभियंता तिवारी आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्यात चर्चा होवून लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा आहे. साठवण तलाव कोंडल्यास परिसरात ४ ते ५ किमी पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.