शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सुखना प्रकल्पात २८ पक्षी प्रजाती

By admin | Updated: December 22, 2014 00:09 IST

औरंगाबाद : पर्यावरणावर प्रदूषणाचा परिणाम आणि पक्ष्यांची काय अवस्था याविषयी वन विभागाने रविवारी पक्षी गणना केली, तेव्हा सुखना प्रकल्पात २८ पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळून आल्या.

औरंगाबाद : पर्यावरणावर प्रदूषणाचा परिणाम आणि पक्ष्यांची काय अवस्था याविषयी वन विभागाने रविवारी पक्षी गणना केली, तेव्हा सुखना प्रकल्पात २८ पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळून आल्या.पक्षी सकाळीच एकत्र आढळून येतात. म्हणून भल्या पहाटे पक्षी निरीक्षणाचा ताफा निघाला. त्यांनी जंगलात पक्ष्यांची गणना सुरू केली. त्यावेळी वेडा राघू, पाणकोंबडी, करकोचे, रोहित, स्पूनबिल, खंड्या, चंडोल, टिटवी, नाम्या व पाच प्रकारची बदकेही निदर्शनास आली. पक्षीमित्र किशोर पाठक, निखिल जहागीरदार, समीर खान, उपवन संरक्षक ए.डी. भोसले, वनक्षेत्रपाल रत्नाकर नागापूरकर, व्ही.एल. गायकवाड, यू.एम. फारुकी आदींनी सुखना प्रकल्पाची पाहणी केली. दुष्काळी अवस्थेत प्रकल्पात २५ ते ३० टक्केच जलसाठा असून, त्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबाद- जालना जिल्ह्यांतील १४ ठिकाणांची माहिती वन विभागाच्या मुख्यालयाच्या हाती आली असून, सविस्तर वृत्तांत दोन दिवसांनंतर मिळणार आहे. वेताळवाडी, धिंगापूर, जंगली तलाव, घाणेवाडी, सुखना प्रकल्प, अंधारी प्रकल्प, सांजूळ तलाव, गडदगड प्रकल्प, टेंभापुरी धरण, पिशोर, वडाळी इ. प्रकल्पांसह औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गणना करण्यात आली. अजून किती ठिकाणी पक्षी दिसतात, त्यांचे राहणीमान, आहारविहार पद्धती आदीच्या अभ्यासासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, ११ जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात गणना होणार आहे. पक्षीमित्र, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात होते.