शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पद्मविभूषणपेक्षा २७ हजार शस्त्रक्रिया केल्याचा आनंद मोठा !

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर :शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

दत्ता थोरे। लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मी साध्या किराणा दुकानदाराचा मुलगा. अशोक कुकडे आणि विजय कर्णिक हे माझे वर्गमित्र म्हणून आयुष्यात आले आणि मी कुटुंबाच्या पार्श्वभूमीप्रमाणे व्यापारी व्हायचे सोडून डॉक्टर झालो. वयाची ८० वर्षे समाधानाने पूर्ण केली. मला मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी आनंद दिला. मी मेहनत करीत गेलो ते मिळत गेले. पण या तीन पुरस्कारांपेक्षा माझ्या हातून २७ हजार शस्त्रक्रिया झाल्या, याचा आनंद मला मोठा आहे. मुंबईच्या ९३ च्या दंगलीत मी सलग ७२ तास न झोपता शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.खासगी दौऱ्यानिमित्त लातूर येथे आले असता ते मंगळवारी खास ‘लोकमत’शी बोलत होते. आपल्या मुलाखतीत वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि मेडिकल इथिक्सबाबतही त्यांनी मते मांडली. ते म्हणाले की, पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेने भारत उपचारासाठी स्वस्त आहे. पण आरोग्याच्या विम्याबाबत जागृती नाही, जी नेमकी परदेशात आहे. आपल्या देशातील नोकरदारांचा आरोग्य विमा कंपन्या सक्तीने करतात. मात्र मध्यमवर्गीयांना आरोग्य विम्यातून उपचार होण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न हवेत. वैद्यकीय शिक्षणात सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मी बांगला देशाला गेलो होतो. तिथेही मेडिकल अ‍ॅडमिशन सरकार करते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये धर्मादाय असल्यामुळे रुग्णालयाला उत्पन्न मिळत नाही. यासाठी सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा कोटा वाढवायला हवा. भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार डॉक्टर कमी आहेत. यासाठी एका प्रोफेसरला तीन - तीन विद्यार्थी घ्यायची परवानगी द्यावी.