शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:09 IST

पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.शेतकरी अलिकडील काळात आधुनिक शेतीकडे वळला आहे. याबरोबरच नगदी पिकांकडे त्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यात ऊसाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र होते. हे क्षेत्र आता १८ हजार ८०० हेक्टरवर गेले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दुष्काळाची तीव्रता असतानाही ऊसाच्या क्षेत्रात २००१ च्या तुलनेत वाढ झाल्याचेच दिसून येते. हीच बाब कापूस उत्पादनाच्या बाबतीत २००१ मध्ये जिल्ह्यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात येत होता.या क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याचे २०१६ मधील आकडेवारी पाहिली असता दिसून येते.२०१५-१६ मध्ये ३ लाख ५२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक घेण्यात आले होते. सोयाबिनच्या क्षेत्रात मागील १५ वर्षात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येते. २००१ मध्ये अवघ्या १० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या सोयाबिनचे क्षेत्र २०१५-१६ मध्ये तब्बल २ लाख ७६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर जाऊन पोंहचले आहे. हीच बाब तेलबियाच्या उत्पादनाबाबत २००१ मध्ये जिल्ह्यातील शेतकºयांनी ५१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर तेलबियाचे उत्पादन घेतले होते. हे क्षेत्र आता २ लाख ८६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र एवढे वाढले आहे.