लातूर : लातूर तालुक्यातील ६४ गावात सार्वत्रिक निवडणूक आणि ४ वार्डातील पोटनिवडणूक जाहीर झाली असून, अर्ज विक्री करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २६५ इच्छुकांनी अर्जांची खरेदी केली आहे़लातूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होत आहे़ त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे़ अर्ज विक्री करण्याच्या पहिल्याच दिवशी २६५ अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती नायब तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली़ ग्रा़पं़ निवडणुकीच्या गतवर्षीचे थकित बिलाबाबत तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काम न करण्याची भूमिका घेतली होती़ दरम्यान, सध्याच्या ग्रा़पं़ निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी १५ एप्रिलपर्यंत तर यापूर्वीच्या प्रलंबित कामकाजासाठी ३० एप्रिलपर्यंत निधी पुरविला जाईल, अशी सूचना येताच तहसीलदारांनी कामकाजास सुरुवात केली आहे़ प्रत्येक प्रभागासाठी सुमारे १० हजार रुपयांचा प्रशासकीय निधीचा खर्च राहणार आहे़ (प्रतिनधी)
२६५ इच्छुकांनी घेतले अर्ज
By admin | Updated: April 1, 2015 01:00 IST