शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कान-टू मोहिमेत २६ बालकामगारांना दिला न्याय

By admin | Updated: March 1, 2016 23:50 IST

हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे.

हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे. १ जुलै २०१५ पासून संपूर्ण देशामध्ये या मोहिमेत हरवलेल्या किंवा बालकामगार म्हणून पळवून नेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. हिंगोली व औंढा या दोन तालूक्यात एकूण २६ बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यांना बालनिरीक्षणगृह तसेच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.अल्पवयीन मुले हरविल्यांच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अजाण बालकांना त्यांच्या कुटुंबाजवळून पळवून नेल्या जात आहे. मानवी तस्करी करणारे त्यांना राज्याबाहेर नेऊन बालकांना वाममार्ग किंवा बालमजुरी करण्यास भाग पाडत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून हिंगोली येथील संबंधित यंत्रणाही निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मुस्कान आॅपरेशनतंर्गत कारवाई करण्यात आली. १८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरातील बसस्थानकात पोनि जगदीश भंडारवार व पोलिस उपनिरीक्षक पी. एम. पाटकर यांनी कारवाई करून ७ बालकांना ताब्यात घेतले होते. सदर बालकांना मध्य प्रदेशातून बालमजुरीसाठी आणल्याचे उघडकीस आले. त्यांना परभणी येथील बाल निरीक्षणगृहात पाठविले असून त्यांच्या पालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पोलिस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले यांनी १० बालकामगारांची सुटका करून त्यांना आईवडिलांच्या स्वाधीन केले. तसेच औंढा नागनाथ परिसरात मुस्कान आॅपरेशनतंर्गत पोलिस उपनिरीक्षक सविता सपकाळे यांच्या पथकाने व पोलिसमित्रांच्या मदतीने कारवाई केली. त्यात १० बालकामगारांची सुटका करून चिमुकल्यांना पालकांच्या स्वाधिन केल्याचे सपकाळे यांनी सांगितले.