शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुलांना २५०० कोटी

By admin | Updated: October 7, 2016 01:26 IST

विकास राऊत , औरंगाबाद राज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे

विकास राऊत , औरंगाबादराज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच राज्यात पावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यासाठी नियोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी बांधकाममंत्री पाटील हे शहरात आले होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांच्याशी संपर्क साधून मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि रस्ते विकासप्रकरणी काय अनुदान देणार, याप्रकरणी विचारणा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांची पाहणी करण्याचे आदेश बांधकाममंत्र्यांनी दिले आहेत. मराठवाड्यात सर्व मिळून १ हजारांच्या आसपास लहान-मोठे पूल आहेत. त्यामध्ये ८१ पूल ब्रिटिश व निजामकालीन असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. जुने सर्व पूल नव्याने बांधावे लागणार असून, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ४०० कोटींची तरतूद होण्याचा अंदाज आहे. बांधकाममंत्री पाटील म्हणाले, मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर अतिवृष्टी झालेल्या पूर्ण जिल्ह्यांतील रस्ते, पुलांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे मूल्यांकन केल्यानंतर अंदाजपत्रकाच्या आधारे किती खर्च लागेल, याचा आकडा समोर येईल. सध्या तातडीने जेथे गरज असेल तेथे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधणी करावी लागेल. एनएचएआय, सीआरएफ, पीडब्ल्यूडीच्या निधीतून काही रस्त्यांची कामे मराठवाड्यात सुरू आहेत. पुलांची पाहणी अजून सुरू आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे वाढली आहेत.अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पंचनामे होणे अपेक्षित आहे. २२ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. त्यांना शासनाने मदत करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व चित्र समोर येईल, असे पाटील यांनी सांगितले.