\भोकरदन : भोकरदनच्या तहसलीदार रूपा चित्रक यांनी गुरूवारी तालुक्यातील भोकरदन शहरासह तडेगाव, तडेगाव वाडी, सोयगाव देवी आदी ठिकाणी जात अवैध वाळू साठ्यांवर छापे मारून २५० ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईमुळे केल्यामुळे तालुक्यातील वाळुमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा सर्रास उपसा सुरू असून, पावसाळ्यामध्ये सुध्दा वाळुची तस्करी करता यावी यासाठी वाळुचे साठे केल्याची तक्रार तहसीलदार चिंत्रक यांच्याकडे आली होती. त्या अनुुषंगाने चित्रक यांनी गुरूवारी पोलिस बंदोबस्तामध्ये या वाळू साठ्यावर छापे मारले व पंचनामे करून वाळू जप्त केली आहे. मात्र या ठिकाणची काही वाळू ही शासनाच्या गायरान जमिनीवर केलेले असल्यामुळे नेमका वाळू साठा कोणी केला याचा तहसिलदारांना शोध लागला नाही. यावेळी तहसिलदार रूपा चिंत्रक यांच्या सोबत संजय बारोटे, पोलिस कर्मचारी ठाकुर, भरत चौधरी, तलाटी मणीयार, व्ही़एल़ बारगळ हे उपस्थित होते़ तहसिलदारानी पंचनामे करून वाळू जप्त केली असली तरी वाळू साठा करणाऱ्यांविरूध्द काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे़ जप्त केलेल्या वाळुचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे चित्रक म्हणाल्या. दरम्यान, तालुक्यातील भोकरदन, पारध पोलिसांनी सुध्दा दोन दिवसामध्ये काही अवैध वाळुच्या वाहने पकडून त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. (वार्ताहर)
२५० ब्रास अवैध वाळू साठा जप्त
By admin | Updated: June 18, 2016 00:50 IST