शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

एटीएम पासवर्ड विचारून २५ हजारांची फसवणूक

By admin | Updated: December 2, 2014 00:55 IST

वाळूज महानगर : तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. मी बँकेचा कर्मचारी बोलतोय.

वाळूज महानगर : तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. मी बँकेचा कर्मचारी बोलतोय. तुमच्या एटीएमचा पासवर्ड नंबर सांगा अशी थाप मारून भामट्याने नेट बँकिंगद्वारे एका कामगाराची २४६२० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. अरविंद दिगंबर इंगोले (रा. गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी) हे एका खाजगी कं पनीत कामाला असून त्यांचे कॉसमॉस बँकेत खाते आहे. ते आजोबा आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी नांदेड येथे गेले होते. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात असताना अरविंद इंगोले यांना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०७ वाजता ९१७०७६५४०१२९ या मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या ९१९६३७२५६५०६ या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी भामट्याने बँकेचा कर्मचारी बोलतोय असे सांगून इंगोले यांच्या एटीएम कार्डबद्दल चौकशी केली. इंगोले यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असता भामट्याने तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते परत चालू करावयाचे असेल तर एटीएमवरील नंबर सांगा असे सांगितले. एटीएम बंद पडण्याच्या भीतीने इंगोले यांनी त्या भामट्यास एटीएम कार्डविषयी सर्व माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच इंगोले यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांच्या खात्यावरील पैसे काढल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली. भामट्याने २४ हजार ६२० रुपये काढले आहेत. या प्रकरणी इंगोले यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सायबर क्राईमकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर इंगोले यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.