शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करीत २५ लाखांची लूट

By admin | Updated: October 12, 2016 00:08 IST

वाशी : तालुक्यातील इसरूप गावच्या शिवारात असलेल्या विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्कीवरील सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यास मारहाण करून चोरट्यांनी ट्रान्स्फार्मरमधील तांब्याच्या उपकरणांची चोरी केली़

वाशी : तालुक्यातील इसरूप गावच्या शिवारात असलेल्या विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्कीवरील सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यास मारहाण करून चोरट्यांनी ट्रान्स्फार्मरमधील तांब्याच्या उपकरणांची चोरी केली़ बचावासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांनी परत हल्ला करून जवळपास २५ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याचे वृत्त आहे़याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील इसरूप, खानापूर व भूम तालुक्यातील दिंडोरी, हिवरा गावच्या शिवारात विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्क्या आहेत. २६ पवनचक्क्याचे काम पूर्ण झालेले असून ६ पवनचक्क्यांची उभारणीचे काम सुरू आहे़ पवनचक्क्याच्या रक्षणासाठी कंपनीने सन सेक्युरिटी कंपनीकडून सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत़ या कर्मचाऱ्याची संख्या ५५ असून त्यांची ड्यूटी ही १२ तासाची आहे. दिवसपाळीस १४ कर्मचारी कार्यरत असतात़ तर रात्र पाळीस ४१ कर्मचारी कार्यरत असतात. सेक्यूरिटीचे इन्चार्ज म्हणून वाशी येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश रणदिवे आहेत़ रणदिवे हे रविवारी रात्री इसरूप शिवारातील लोकेशन नंबर वाय - २ या पवनचक्कीवर कार्यरत होते.१० ते १५ चोरटे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पवनचक्कीच्या आवारातील ट्रान्स्फार्मरजवळ दिसून आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली़ चोरट्यांकडून दगडफेक होत असल्याने सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी रायफलमधून हवेत काही फैैरी झाडल्या. यामुळे चोरटे पळून गेले़ मात्र, काही वेळातच परत येवून त्यांनी सुरेश रणदिवे व येरमाळा येथील सुरक्षा सहाय्यक शेख यांना जबर मारहाण केली़ त्यानंतर मुख्य ट्रान्सफ ार्मरमधील तांब्याच्या क्वाईल घेऊन पोबारा केला़ दरम्यान, याप्रकरणी जखमींचे जबाब घेतल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़