शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेशाचा फज्जा

By admin | Updated: May 23, 2016 23:33 IST

संजय तिपाले ल्ल बीड बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा नियम आहे.

संजय तिपाले ल्ल बीडबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यात मोफत प्रवेशाचा पुरता फज्जा उडाला आहे. आतापर्यंत केवळ ३५० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश नोंदी केल्या आहेत.विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत व स्वयंअर्थसहायित शासनमान्यताप्राप्त शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देतात, त्यांचे शैक्षणिक शुल्क शासन संस्थांना अदा करते. इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांचा ओढा आहे. मात्र, विशिष्ट शाळांनाच पालक पसंदी देतात. २०१६- १७ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन नोंदी करावयाच्या आहेत. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शाळांमध्येच १५ ते २३ मे २०१६ या दरम्यान आॅनलाईन प्रवेश नोंदी करावयाच्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे केवळ ३५० इतक्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी झाल्या आहेत.जिल्ह्यात १२८ शाळांमध्ये १५७९ जागाजिल्ह्यातील १२८ इंग्रजी शाळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रमाणे १५७९ जागांवर अनुसूचित जाती, जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात; परंतु आॅन्लाईन प्रवेश नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट ठरू लागली आहे. अनेक पालकांना आॅनलाईन प्रवेश नोंदी करायच्या आहेत हेच माहीत नाही. मोफत प्रवेशपासून विद्यार्थी वंचित ठेवण्याचा हा पद्धतशीर डाव असल्याचा आरोप शिवसंग्रामचे मनोज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. सोडत पद्धतीने निवडविशिष्ट नामांकित शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशासाठी पालकांनी उपलब्ध जागांपेक्षा अधिक नोंदी केल्या आहेत. त्यामुळे तेथे सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. सोडतीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार असून यावेळी विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी शाळांमध्ये पाठविले जातील, असे शिक्षणाधिकारी (प्रा.) हिंगोणेकर यांनी सांगितले.३० मेपर्यंत मुदतवाढ२५ टक्के कोट्यातून आॅनलाईन प्रवेश निश्चितीसाठी १५ ते २३ मे ही मुदत होती. मात्र, अनेक पालक यापासून अनभिज्ञ राहिले. शिवाय ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्यानंतर पालक प्रवेशाची लगबग करतात. उन्हाळी सुट्यामुळे आॅनलाईन नोंदीला थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाकडून ३० मे पर्यंत प्रवेश निश्चिसाठी मुदतवाढ दिली आहे. जास्तीत जास्त पालकांनी २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी केले आहे.