शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या २५ % आरोग्यावर खर्च

By admin | Updated: August 3, 2014 01:12 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे

बापू सोळुंके, औरंगाबादशहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे दर आणि संपत चाललेली फॅमिली डॉक्टरची संकल्पना या पार्श्वभूमीवर लोकमत संपादकीय विभागाच्या वतीने शहरातील वैद्यकीय सेवांबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाने अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ६३ टक्के औरंगाबादकर आपल्या उत्पन्नापैकी सुमारे २५ टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करीत आहेत, तर सुमारे २५ टक्के नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करावा लागत आहे. ७ टक्के नागरिक असे आहेत की, त्यांच्या उत्पन्नातील अर्धी रक्कम ही कुटुंबातील सदस्यांच्या औषधोपचारावर खर्च करतात. महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली. ५८ टक्के नागरिकांनी जवळच्या कोणत्याही रुग्णालयात, तर १७.१४ टक्के नागरिकांनी उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाणे पसंत केले आहे. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत. इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. पूर्वी घरातील कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी एक डॉक्टर ठरलेला असायचा. त्यास ‘फॅमिली डॉक्टर’ असे संबोधले जाते. आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्षआजारी पडल्यानंतर अथवा आजार तिसऱ्या अथवा चौथ्या टप्प्यात गेल्यानंतर रुग्ण दवाखान्यात जातो. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. तेव्हा डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडतात. अशा प्रसंगांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने वर्षातून एक वेळ विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ २५.७१ टक्के लोक हे कुटुंबातील व्यक्तींची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करतात.५२.८५ टक्के जण अशा प्रकारची तपासणी करीत नाहीत आणि ११.४२ टक्के नागरिकांनी आतापर्यंत कधीच आरोग्य तपासणी केली नसल्यााचे समोर आले आहे.महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. सुमारे २५ टक्के नागरिक वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करतात तर ७ टक्के नागरिक ४५ टक्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करीत असल्याचे समोर आले आहे.इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत.केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली.६८ टक्के नागरिक म्हणतात फी खूप जास्तशहरातील खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारी फी खूप जास्त असल्याचे ३१.४२ टक्के नागरिकांना वाटते, तर ३७.१४ टक्के जणांना वैद्यकीय सेवेचे दर जास्त असल्याचे वाटते, तर ३१ टक्के नागरिकांनी वैद्यकीय उपचारासाठी आकारले जाणारे शुल्क समाधानकारक असल्याचे नमूद केले आहे.७३ टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून दूरवैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी सुमारे ६८ टक्के लोक आरोग्य विम्यापासून दूर असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर ४.२८ टक्के लोकांना आरोग्य विमा ही संकल्पनाच माहीत नाही. २७ टक्के लोकांनी आरोग्य विम्याचे छत्र घेतले आहे.