शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

२५ बासरीवादकांची एकाच मंचावर जमली मैफल

By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST

औरंगाबाद : एक मंच, एक कार्यक्रम आणि एकाच वेळी २५ बासरीवादक, अशी मनोहारी व आनंददायी मैफल संगीत रसिकांना अनुभवास मिळाली.

औरंगाबाद : एक मंच, एक कार्यक्रम आणि एकाच वेळी २५ बासरीवादक, अशी मनोहारी व आनंददायी मैफल संगीत रसिकांना अनुभवास मिळाली. स्फूर्ती महिला मंचने बुधवारी आयोजित शास्त्रीय संगीताच्या बासरीवादन कार्यक्रमात संकल्पना म्युझिक क्लासेसच्या २५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी उत्कृष्टरीत्या बासरीवादन केले. यात १४ वर्षांवरील मुला-मुलींचा सहभाग होता.हा कार्यक्रम सादरकर्ते गिरीश काळे म्हणाले की, बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम होत असतात; परंतु त्यांचा प्रसार कमी असतो. बासरी या पारंपरिक वाद्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीतात बासरीवादनाला मानाचे स्थान आहे. पं. राकेश चौरसिया यांनी पाश्चात्त्य वाद्यांबरोबरच भारतीय बासरीवादनाचे कार्यक्रम करून जागतिक संगीताच्या व्यासपीठावर बासरीला नेवून ठेवले आहे. एका व्यासपीठावर बासरीवादन, सुगम गायन, हिंदी, मराठी भावगीते तसेच फ्युजन गीते सादर होत असतात, असे काळे म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात भूप रागाने करण्यात आली. नंतर कल्याण रागातून निर्माण झालेला यमन राग तसेच भावगीत, भक्तिगीत सादर झालेला राग दुर्गा सादर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या समूहाने ‘सारंग रागाबरोबरच ओम जय जगदीश हरे...’ ही गत सादर केली. (गायली जाते ती चिज आणि वाजवली जाते ती गत) त्यानंतर ‘एक प्यार का नगमा है’, ‘पंख होते तो उड़ आती है’, ‘प्रेमानंद माऊली (भावगीत), लोकप्रिय बालगीत ‘लकड़ी की काठी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’, ‘जयोस्तुते’ या गाण्यांच्या गत सादर करण्यात आल्या. त्यांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. गिरीश काळे यांना तबल्यावर अमेय बाभूळगावकर, जगदीश लोहार, पखवाजवादक विनय संकपाळ यांनी साथ दिली. स्फूर्ती महिला मंचच्या अध्यक्ष अनुराधा सुभेदार, दमयंती मुळे, विमल तळेगावकर, मीना देशपांडे, नीला रानडे, सुवर्णलता शर्मा, ज्योत्स्ना राऊत, सुखदा नांदूरकर, शोभा प्रभुणे, पुष्पा कुलकर्णी, कालिंदी कोर्डे आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला मंडळाच्या मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.