शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२४५१ विद्यार्थ्यांची माहिती अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:40 IST

अल्पसंख्यांक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच एका दिवसांत २४५१ विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वृत्ताची दखल घेत माहिती तत्काळ आॅनलाईन सादर केल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अल्पसंख्यांक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच एका दिवसांत २४५१ विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वृत्ताची दखल घेत माहिती तत्काळ आॅनलाईन सादर केल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना बँक खात्यावर एक हजार रूपये रक्कम जमा केली जाते. ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख आहे. परंतु संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनवर सादर केली नव्हती. एकूण ८३०७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच उपलब्ध असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहू शकतात. त्यामुळे आता उर्वरित विद्यार्थ्यांचीही माहिती लवकरच उपलब्ध होईल,असे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्हा लॉगीनला प्राप्त झालेली विद्यार्थ्यांची माहिती नॅशनल पोर्टलवर पाठविली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना निश्चित शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. शिवाय इतर पात्र विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे.