शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३९ दारू दुकानांना लागले टाळे !

By admin | Updated: April 2, 2017 00:28 IST

जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३५० दुकानांपैकी २३९ दारू दुकने बंंद करण्यात आली आहेत.

जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३५० दुकानांपैकी २३९ दारू दुकने बंंद करण्यात आली आहेत. या दुकानांतून उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी सुमारे तीन कोटींचा महसूल मिळत होता. जिल्ह्यातील २ वाईनबार, ४२ देशी दारूचे दुकाने, ३८ बिअर शॉपी आणि १५८ परमिट रूमचा समावेश आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दारू दुकानांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने ५०० मीटर अंतराच्या आत असलेली दुकाने हटविण्याचे आदेश दोन दोन महिन्यांपूर्वीच दिले होते. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. दारूच्या दुकानामुळे राज्याला मिळणारा कोट्यवधी महसूल बुडणार असल्याने यावर खलबते सुरू होती. जालना जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य आयुक्तांचे आदेश उशिराने मिळाल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत दुकानांना शनिवारी नोटीस बजावून २३९ दारू दुकाने बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा उत्पादन शुल्कच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. राज्यातील दारू दुकानदारांचा राज्य शासनावर वाढता दबाव बघता राज्य शासनाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमिट रूम राहतील असे स्पष्ट करीत दुकानारांनी नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक दारू दुकानदारांना दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी नवे आदेश काढून १ एप्रिल पासून राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या अंतराच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने २३९ दारूची दुकने बंद करण्याचे आल्याचे झावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)