परंडा : कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी राज्य शासनाने १३ कोटींचा निधी उपलब्ध केला असून, यातून जिल्ह्यातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या २२३६ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.जिल्ह्यातील महावितरण व ऊर्जा विभागाशी संबंधित नवीन कामे तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत २० जानेवारी रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले होते. या अनुषंगाने बावनकुळे यांनी कृषी पंपांना वीज जोडणीसाठी १३ कोटींचा निधी जाहीर केला आहे. याबरोबरच परंडा तालुक्यातील डोमगाव येथे पायाभूत विकास योजनेअंतर्गत नवीन विद्युत उपकेंद्राला मंजुरी देण्यात आल्याचेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले असून, वीज जोडणीबाबतची कार्यवाही निविदेच्या अंतिम स्तरावर असल्याचे तर उपकेंद्राबाबतची कार्यवाही जागा संपादीत करण्याच्या स्तरावर असून, केंद्र सरकारच्या दीनदयाळ योजनेअंतर्गत जिल्ह्यात नवीन ३६ विद्युत उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच्या मंजुरीसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
२२३६ कृषी पंपांना मिळणार वीज जोडणी
By admin | Updated: March 13, 2015 00:41 IST