शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २२ पर्यटनस्थळांचा योजनांतून होणार कायापालट!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री यांनी नुकतीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे. राज्या शासनाच्या विविध विभागांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. राज्यात जेथे पर्यटन केंद्र आहे त्या भागाचा गतीने विकास झालेला आपल्याला दिसून येतो. रोजगाराच्या संधीसह आर्थिक उलाढाल वाढीचे हे प्रमुख कारण आहे. पर्यटनावर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्य, देशपातळीवर आणि परदेशी पाहुणेही भर देतात. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण व्हावे, यादृष्टिने जिल्ह्यात पर्यटन क्लस्टर तयार करण्याचा निर्णय स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे. जाळीचा देव, राजूर, शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ, सूर्य मंदिर, वेद मंदिर, मत्स्योदरी मंदिर, रेणुका देवी आदी तीर्थस्थळ आणि पर्यटन केंद्रांचा यामध्ये अंतर्भाव आहे. स्थळांची यादी तयार करण्यात आली असून, स्थळानुसार प्राधान्यक्रम ठरवून त्या भागाच्या विकासासाठी पर्यटन, ग्रामीण विकास, जिल्हा नियोजन यासह विविध विभागांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांसमवेत आपण बैठक करणार आहोत. त्या-त्या गावाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करुन कालबद्ध कार्यक्रम राबविणार असल्याचे लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ग्रामविकास, पर्यटन मंत्रालय, जिल्हा नियोजन समितीचा निधी, आमदार, खासदार आणि विशेष उपक्रमांतर्गत निधी या गावांच्या विकासकामांसाठी वापरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.