शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

२२ रेशन दुकानदारांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:25 IST

ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़परभणी जिल्ह्यात मे महिन्यापासून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्याने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनचे तालुकानिहाय प्रशिक्षण रेशनदुकानदारांना दिले़ त्याचप्रमाणे २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात ई-पॉस मशीन हाताळण्यासंदर्भात तांत्रिक अधिकाºयांमार्फत मार्गदर्शनही करण्यात आले़ ३० मे रोजीच्या पत्रानुसार तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लिंकवेल कंपनीच्या तांत्रिक अधिकाºयांनी सर्व ई-पॉस दुकानांतील मशीनचे प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणही दिले़ त्यानंतर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करण्याचे बंधनकारक केले होते़ सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वितरित करताना त्यात पारदर्शकता यावी, सर्व धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे, या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र त्यानंतरही काही रेशन दुकानदार ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करीत नसल्याची बाब पुरवठा अधिकाºयांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न झाल्यास कारवाई करण्याचा पवित्रा पुरवठा विभागाने घेतला आहे़ त्याअंतर्गत पुरवठा विभागातील नायब तहसीलदारांकडून मिळालेल्या अहवालानुसार १० रेशन दुकानदारांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ५० पेक्षा कमी ट्रान्झेक्शन केल्याचे निदर्शनास आले़ याचाच अर्थ किमान ५० लाभार्थ्यांनाही महिनाभरात ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित केले नाही़ तसेच १२ रेशन दुकानदारांनी केलेले आधार व्हेरीफिकेशन हे शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे २२ रेशन दुकानदारांनी अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयातील तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी २२ रेशन दुकानदारांची परवान्यापोटी जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला असून, या पुढे अशा चुकांची पुनरावृत्ती करू नये, अशी ताकीद या दुकानदारांना दिली आहे़