शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तीन तालुक्यातून २२ जणांचे आक्षेप

By admin | Updated: February 5, 2015 00:54 IST

उस्मानाबाद : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे आणि नव्याने अस्तिवात आलेल्या ४२९ ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून

उस्मानाबाद : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे आणि नव्याने अस्तिवात आलेल्या ४२९ ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, ४ फेब्रुवारी पर्यंत कळंब, उस्मानाबाद व उमरगा तालुक्यातून निवडणूक आरक्षण व प्रभाग रचनेवर २२ जणांनी आक्षेप दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ४२९ गावात प्रभागनिहाय कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या आरक्षणासंदर्भात हरकत दावे दाखल करण्यासाठीचा कालावधी ५ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आल्याने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे.२0११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामध्ये ५0 टक्के सहभाग महिला उमेदवारांना देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने ४२९ ग्रामपंचयातीचे आरक्षण व प्रभागरचना २८ जानेवारी रोजी त्या त्या तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले होते. यावर उस्मानाबाद तालुक्यातून ८, कळंब १० तर उमरगा तालुक्यातून चार अशा २२ जणांनी निवडणुक आरक्षण व प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. काही तालुक्यातील ग्रामंपचायत निवडणूक आरक्षणाबाबत तलाठ्यांनी चुकीचे माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने आरक्षण व प्रभाग रचनेबाबत काही जणांनी आक्षेपही घेतल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. प्रभाग रचना व आरक्षणाचा नमुना ‘ब’ प्रस्तावावर कुणाला हरकती, सूचना दाखल करावयाच्या असल्यास त्या ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.