शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावात २१ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: June 29, 2014 00:59 IST

एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

एम़जी़मोमीन , जळकोटतालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ शिवाय, साठवण तलावावर शेतकऱ्यांनी बसविलेले मोटारीतून उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्यात मोठी घट होत आहे़ जळकोट तालुक्यातील निरगा, डोंगरगाव, सोनवळा, माळ हिप्परगा, हळद वाढवणा, चेरा (२), केकतसिंदगी, हावरगा, जंगमवाडी, घोणसी, गुप्ती (२), रावणकोळा आदी १२ साठवण तलावात तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस जास्त असल्याने १०० टक्के तलाव तुडूंब भरले होते़ या तलावातील पाण्यावर १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे़ ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपसा वाढविला आहे़ भर उन्हाळ्यात या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला आहे़ त्यामुळे तुंडुब असलेले साठवण तलाव अल्पावधीत तळाला गेले आहेत़ सध्या तालुक्यातील शंभर टक्के भरलेल्या साठवण तलावामध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाणीपुरवठा उपविभाग वाढवण्याचे उपअभियंता व्ही़बी़सुळे यांनी सांगितले़दरवर्षी जळकोट तालुक्यात जून च्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस पडतो़ त्यामुळे कोरडे पडलेल्या तलावात पुन्हा पाणीसाठा वाढत राहतो़; परंतु सध्या जून महिना संपत आला तरी तालुक्यावर पावसाचा एकही शितोडा पडला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणीसाठा कमी होत चालत असल्याचे दिसून येत आहे़ तालुक्यातील साठवण तलावावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या मोटारी चालू असून आगामी काळात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास भविष्यात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ प्रशासनाने याची दखल घेवून तलावावरील मोटारी बंद कराव्यात अशी मागणी दत्ता घोणसीकर, रामेश्वर पाटील, रमेश पाटील, बालाजी तिडके यांच्यासह नागरिकांतून होत आहे़ प्रशासनाचे दुर्लक्ष़़़़तालुक्यातील १२ साठवण तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या तलावातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे़ दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ शेतकऱ्यांनी मोटारी लावून पाणी उपसा वाढविला असल्याने तलावांनी तळ गाठला आहे़ विशेष म्हणजे २० गावांना याच तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे़ ढोरसांगवी तलावावरून जळकोट, कुणकी गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या प्रकल्पातून पाणी संपल्यास दोन्ही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार, अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने पाणी उपसा करणाऱ्या मोटारींकडे दुर्लक्ष केले आहे़