शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरी प्रकरणी २१ गुन्हे दाखल

By admin | Updated: April 9, 2017 23:29 IST

परतूर : परतूर तालुक्यात वाळू मफिया विरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे

परतूर : परतूर तालुक्यात वाळू मफिया विरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर डोल्हारा पात्रातील वाळू चोरी थांबवण्यात महसूल व पोलिस प्रशासनाला यश आले आहे. परतूर तालुक्यातील गोदावरी व दुधना नदीच्या काही वाळू पट्टयातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सतत सुरू असते. यातच डोल्हारा वाळू पट्टा चांगलाच गाजला आहे. वाळू माफिया व गावकरी यांच्यातही या वाळू चोरी प्रकरणी संघर्ष पेटला होता . या वाळू तस्करी प्रकरणी गावातील काही मंडळी व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी यात गुंतले होते. यामुळे महसूल व पोलिस यांनी मोहीम उघडून वाळू माफियांचे वाळू साठे जप्त करू न दंड आकारला. ज्या शेतातून वाळू मफियांनी वाटा केल्या होत्या त्या वाटात जेसीबीने खड्डे खोदण्यात आले आहेत. परतूर व वाटूर मंडळा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर कावजवळा सजाचे तलाठी बाळापूरे यांच्या निलंबनाचा व विभागीय चौकशीचा प्रस्तावही वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. या माफियांविरूध्द आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्याबरोबरच २ लाख ३४ हजार ५८२ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाळू लिलावातून १ लाख ४३ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने एका पथकाची स्थापना केली आहे.एकूणच महसूल व पोलिस विभागाने वाळू माफियांचे पाश आवळले असून, ही कारवाई आणखी तीव्र होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)