लातूर : महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या मोकाट जनावरांना कोंडवाड्यात घालण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून, शनिवारी १४ व रविवारी ७ अशा २१ जनावरांना कोंडवाड्यात सोडण्यात आले. दरम्यान, तिघा पशुपालकांकडून ३ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यांवरील मोकाट जनावरांना कोंडवाड्यात सोडण्याची तसेच संबंधित पशुपालकांवर दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे. तरीही रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. पहिल्या दिवशी एका जनावरासाठी ७०० रुपये तर पुढील प्रत्येक दिवसासाठी प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. सात दिवस कोंडवाड्यात जनावरे राहिल्यानंतर आठव्या दिवशी लिलाव काढण्यात येणार आहे, अशी कारवाई महानगरपालिकेने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
कोंडवाड्यात २१ जनावरे
By admin | Updated: August 22, 2016 01:18 IST