शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला

By विकास राऊत | Updated: March 4, 2025 06:03 IST

किती रक्कम अडकली याची मोजदाद अजून सुरूच, किती पैसे परत मिळतील; मिळतीलही की नाही या चिंतेने काळीज ग्रासले 

विकास राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : युनोने २०२५ हे वर्ष ‘सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. असे असताना राज्यातील अवसायनात निघालेल्या सहकारी पतसंस्थांचा आकडा वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजघडीला राज्यात २००८ पतसंस्था अवसायनात निघाल्या असून, यामुळे लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. आर्थिक ‘पत’ गेलेल्या संस्थांमधून किती रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत, याचे विश्लेषण सहकार आयुक्तालयात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पै न पै जमा करून पतसंस्थांमध्ये पिग्मीद्वारे भरणा केलेली रक्कम असू देत किंवा एफडी केलेली असू दे, अनेक ठेवीदारांची रक्कम अवसायनात निघालेल्या पतसंस्थांमध्ये अडकून पडली आहे. ही रक्कम केव्हा मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श सहकारी पतसंस्थेत २४ हजार ठेवीदारांची २०२ कोटींची रक्कम अडकल्याचे उदाहरण वानगीदाखल घेता येईल. राज्यातील सहा प्रशासकीय विभागांचा धांडोळा घेतला तर प्रत्येक विभागात सहकारी पतसंस्था बुडीत निघण्याचे आकडे डोळे दीपवणारे आहेत. 

राज्यात जळगाव आघाडीवर 

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १७४ पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर १५८, सोलापूर ११६ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०२ पतसंस्थांची पत गेली आहे.  नागपूर आणि मुंबई-३ भागात एकही पतसंस्था अवसायनात निघालेली नाही.

ठेवीदारांना अपेक्षा

मागील महिन्यात शिर्डी येथे सहकार परिषद झाली. त्यात अवसायनातील पतसंस्थांबाबत चिंतन झाले. या चिंतनातून ठेवींची रक्कम मिळण्याच्या दिशेने पाऊल पडावे, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

ठेवीदारांच्या रकमेचे विश्लेषण : ठेवीदारांची किती रक्कम अडकलेली आहे, याचे विश्लेषण सुरू असल्याचे सहकार आयुक्तालय सूत्रांनी सांगितले. मार्चनंतर निश्चित आकडा समोर येईल. 

विभागनिहाय किती बुडीत पतसंस्था? नाशिक     ४३७कोल्हापूर ३१६पुणे         २१३लातूर     २११मुंबई     १८९अमरावती १७६छ. संभाजीनगर १६३कोकण     १६१नागपूर     १४२

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक